साकेश्वर ग्रामीण विकास संस्थेत सायबर जागरुकता कार्यक्रम संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

साकेश्वर ग्रामीण विकास संस्थेत सायबर जागरुकता कार्यक्रम संपन्न

 

अहिल्यानगर, दि. २५ : सायबर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत साकेश्वर ग्रामीण विकास संस्था, अडसुळ टेक्निकल कॅम्पस, चास येथे सायबर विषयावरील जागरुकता कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, प्रा. अनिरुद्ध अडसुळ, प्राचार्य डॉ. प्रदीप पाटील, डॉ. अंकुश शिर्के, डॉ. दिनेश अडोकर, श्रीमती प्रियंका कंधारे, वैभव लोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना डिजिटल अरेस्ट, मोबाईल हॅकिंग, फेक अकाउंट या विषयांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच आर्थिक फसवणुकीपासून कसे वाचावे, सायबर गुन्हे तपासाची पद्धत, सायबर कायदे आदींबाबत मार्गदर्शन केले.

 

पोलीस नाईक अभिजीत अरकल यांनी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँक तपशील व ओटीपी शेअर न करणे, व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे होणारी फसवणूक, बँकेच्या नावाने येणाऱ्या एपीके लिंक/फाईल्स, बनावट कॉल, लॉटरी लागल्याचे खोटे आश्वासन, शेअर्समध्ये गुंतवणूक करून जास्त परतावा, टार्गेट पूर्ण केल्यावर पैसे मिळणे, व्हिडिओ शेअर करून पैसे मिळणे अशा विविध आमिषांद्वारे नागरिकांची लूट कशी केली जाते, याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच फेक वेबसाईट्स, मोबाईल हॅकिंग, बँक पासवर्ड आणि सुरक्षा अपडेट याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

 

हा उपक्रम पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्म यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस नाईक अभिजीत अरकल, महिला पोलीस हवालदार सविता खताळ, पोलीस नाईक दीपाली घोडके तसेच मोहम्मद शेख यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

और पढ़ें