नांदेड: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले )या पक्षाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.ना. देवेंद्र फडणवीस साहेब ,मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन पाठविण्यात आले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले )या पक्षाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.ना. देवेंद्र फडणवीस साहेब ,मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन पाठविण्यात आले.

या निवेदनात महाराष्ट्र शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे. तसेच नांदेड शहरातील अतिवृष्टीमुळे घरात पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे अशा आपत्तीग्रस्तांना तात्काळ जास्तीत जास्त मदत देण्यात यावी. मा. मुख्यमंत्री महोदयांना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आदरणीय‌ पॅथर विजय दादा सोनवणे, रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष मा. सुखदेव चिखलीकर, रिपब्लिकन पक्षाचे नांदेड जिल्हाअध्यक्ष मा.मिलिंद शिराढोणकर, रिपब्लिकन पक्षाचे महानगर सरचिटणीस मा.प्रतीक सोनवणे,रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते मा. राहुल लांडगे, रमेश वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment