श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात रोजगार मार्गदर्शन शिबिर संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात रोजगार मार्गदर्शन शिबिर संपन्न

कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पूर्णा (प्रतिनिधी): श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय, पूर्णा येथे पदवी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. ए. ए. नाईक यूनायटेड रॅडीकल टेक्नॉलजी प्रायवेट लिमिटेड आणि महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, करिअर मार्गदर्शन कक्ष, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले.

ए. ए. नाईक यूनायटेड रॅडीकल टेक्नॉलजी प्रायवेट लिमिटेड चे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरुण शहाणे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यामधील रोजगार, बाजारातील बदलते प्रवाह, विविध कौशल्ये आणि करिअर घडवण्याच्या नव्या दिशा याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच श्री. अभिषेक आडे यांनी विविध कौशल्य विद्यार्थ्यांनी कसे आत्मसात करावे या बद्दल मार्गदर्शन करून आधुनिक रोजगार बाजारातील नवनवीन क्षेत्रांचे सखोल विश्लेषण सादर केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार होते. करिअर मार्गदर्शन कक्षाचे समन्वयक डॉ. जे. एस. पुल्ले आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संजय दळवी हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. दिशा मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयीन शिक्षणाचा उद्देश फक्त शिक्षण घेणे एवढाच नाही तर शिक्षणाबरोबरच योग्य मार्गदर्शन आणि तयारी तितकीच महत्त्वाची असते हे सांगितले तसेच हा उपक्रम विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि उद्दिष्ट ठरवण्याची प्रेरणा देईल असे मत व्यक्त केले. कू.वैशाली देसाई आणि कू. दिव्या देसाई ह्यांनी सूत्रसंचलन केले तर कार्यक्रमाच्या शेवटी वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका डॉ. स्मिता जमधाडे यांनी आभार प्रदर्शन.

या शिबिरात वाणिज्य, कला आणि विज्ञान तिन्ही शाखेच्या एकूण 113 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सेमिनार साठी मोतीराम शिंदे , आदित्य पांचाळ, समीरा, आणि गायत्री बुचले या विद्यार्थ्यांनी संवाद साधला.

सेमिनार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वाणिज्य विभागातील प्रा. वैजनाथ ईडोळे, श्री कृष्णा बेटकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ रवींद्र राख, डॉ वृषाली आंबटकर,डॉ. सोमनाथ गुंजकर, डॉ , अंबिका चोंढे उपस्थित होते तसेच कर्मचारी. श्री. भगुसिंह बायस, श्री. कालिदास वैद्य, श्री. गजानन भालेराव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीरित्या घेतल्याबद्दल श्री गुरू बुद्धीस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. प्रमोदअण्णा एकलारे, सचिव श्री. अमृतराज कदम, सहसचिव श्री. गोविंदराव कदम आणि कोषाध्यक्ष श्री उत्तमरावजी कदम यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोजगार जागरूकता, व्यावहारिक दृष्टिकोन आणि कौशल्यविकासाची प्रेरणा निर्माण झाली.

Leave a Comment