रेल्वे मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 25 रोजी होणार
पूर्णा(प्रतिनिधी)-येथिल रेल्वे हायर सेकंडरी स्कुल(मराठी शाळा)चा स्नेह मेळावा -2 चे आयोजन भव्य प्रमाणात करण्यात आले आहे
दि 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता रेल्वे कम्युनिटी हॉल येथे सर्व माजी विद्यार्थी जेके बाहेर गावाहून येणार आहे त्याच्या साठी सायंकाळी 6 ते 10 च्या दरम्यान संगीत रजनी व भोजनाचे आयोजन केले आहे. 
मुख्य कार्यक्रम दि 25 ऑक्टोबर रोजी होणार असून सकाळ चे सत्र शंभर वर्षे जुन्या रेल्वे मराठी शाळेत होणार आहे सकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांचे एकत्रि करणं झाल्यावर सकाळी 7 30 वाजता ध्वजारोहण होईल.7 45 वाजता माजी विद्यार्थ्यांची परेड होईल तसेच शिक्षकाचे मनोगत होणार आहे सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यां तर्फ दांड्या व लेजिम चे प्रात्यक्षिक होईल त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना नास्ता दिला जाईल
सकाळी 11 वाजता रेल्वे कम्युनिटी हाल येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .या ठिकाणी शिक्षक व विद्यार्थी यांचे आगमन झाल्यावर सर्व शिक्षकांचे स्वागत विद्यार्थ्यांन तर्फ करण्यात येणार आहे या वेळी शिक्षक व विद्यार्थी आप आपल्या काळातील अनुभव कथन अर्थात मनोगत व्यक्त करतील दुपारी 1 30 वाजता भोजन झाल्यावर दुसऱ्या सत्रात आजी माजी विद्यार्थी समितीतील कार्य करणाऱ्या विद्यार्थीचा सत्कार होणार आहे या वेळी 1975 ते 2010 या काळातील प्रत्येक बॅच ला बोलवून समृती चिन्ह वितरण करण्यात येणार आहे .मागील तीन महिन्यासाठी स्नेह मेळावा 2 साठी शिक्षक व विद्यार्थी प्रयत्न करत आहे या मध्ये प्रमुख राम एकनाथ शिंदे,माजी प्राचार्य वसंतराव मुडे, भास्कर भाले, पुष्पा कोकीळ,शेशिकात डोके,ज्योती नायर,मिलिंद लोंढे, उत्तम कांबळे,कांचन ठाकूर, यांच्या सह अनेक माजी विद्यार्थी व शिक्षक परिश्रम घेत आहे.
