👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

*शेतकऱ्यांनी कृषि समृद्धि योजनेतील विविध घटकांसाठी अर्ज करावेत- जिल्हा अधिक्षक कृ‍षी अधिकारी*

 

नांदेड, दि. 28 ऑक्टोबर : कृषि क्षेत्रात भांडवली गुंतवणुक वाढवून पायाभुत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पिक विविधीकरण, मुल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कृषि समृध्दी योजना सन 2025-26 पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत उत्पादकता, शाश्वतता आणि उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी गुंतवणूक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये हवामान अनुकूल बियाणे, पिकांचे वैविध्य, जमिनीची सुपीकता व्यवस्थापन, यांत्रिकीकरण व मजबूत मूल्य साखळी तयार करण्यावर भर दिला जात आहे.

याशिवाय, डिजीटल शेती, काटेकोर शेती, यंत्रसामुग्री सेवा, कृषि, गोदाम, प्रक्रिया व निर्यात यावर तसेच, शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने योजनांची आखणी व अंमलबजावणी

करण्यासाठी विविध योजना व उपक्रमांसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारण्यात येत आहेत. निर्यात वृद्धीच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्रोत्साहन देणेसाठी नियोजन केलेले असुन यासाठी शेतकऱ्यांचा उदंड

प्रतिसाद लाभणे अपेक्षीत आहे.

या योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनुदानीत घटकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या घटकातील देय अनुदान प्रमाण व मर्यादा लागु राहणार असुन प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) देण्यात येणार आहे. ही योजना डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीव्दारे राबविण्यात येणार असुन योजनेंतर्गत शेतकरी /महिला गट, उत्पादक कंपन्या यांना प्राधान्य देण्यात येत आहे. अल्प, अत्यल्प भुधाकरक, महिला शेतकरी, अनुसूचित जाती, जमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील. या प्राधान्यक्रमाचा महाडिबीटी प्रणालीमध्ये समावेश असल्याने कृषि विभागाच्या https://mahadbt. maharashtra.gov.in/farmer या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज

करावेत.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, नांदेड अधिनस्त तालुका कृषि अधिकारी यांना कृषि समृद्धी योजनेमध्ये विविध घटकांसाठी लक्षांक प्राप्त झालेला असुन केंद्र व राज्य शासनाकडील सद्स्थितीत असलेल्या योजनांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेमध्ये लाभार्थी निवड तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज करुन ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार केली जाणार आहे. या योजनेमध्ये समाविष्ट घटक म्हणजेच, एकात्मिक खत व्यवस्थापन अंतर्गत प्रोम खते प्रोत्साहन योजना, प्राथमिक प्रक्रिया अंतर्गत बीज प्रक्रिया संच स्थापन करणे, किसान ड्रोन योजना, जैविक निविष्ठा संसाधन केंद्र (बी आर सी ( स्थापन करणे, काढणे पश्चात व्यवस्थापन अंतर्गत गोदाम बांधकाम योजना , शेतमाल विक्रीसाठी फिरते वाहन विक्री केंद्र सुविधा योजना, पीक प्रात्यक्षिक चिया पीक, पीक प्रात्यक्षिक मका पीक, कॉटन श्रेडर इत्यादी घटकांसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करण्यासाठी मागणी करण्यात येत आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

 

 

Leave a Comment

और पढ़ें