
*फायनान्स कंपन्यांवर कारवाई करा – महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे..*👇
ना.रोड (प्रतिनिधी) आज दिनांक 17/12/2025 बुधवार रोजी *भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक अप्पर आयुक्त जितेंद्र वाघ साहेब* यांची भेट घेऊन निवेदन दिले..
निवेदनाचा आशय असा आहे की सध्या नाशिक जिल्ह्यात व उत्तर महाराष्ट्रात फायनान्स कंपन्यांचा सुळसुळाट झाला असून शेतकरी कष्टकरी कामगार कंपनी मालक यांना कर्ज देतात व कर्जाचे हफ्ते वेळेवर गेले नाही तर तारण ठेवलेल्या प्रॉपर्टी विकण्याचा षडयंत्र होत आहे..
ह्यामध्ये चेन्नई स्थित चोलामंडलम कंपनी अग्रस्थानी असून कामटवाडा येथे असाच प्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे कर्जदार मयत असताना वारसांच्या नावे असलेली प्रॉपर्टी कब्जा केली आहे..
सदर प्रकरणात हायकोर्ट व डी.आर.टी कोर्टात केस प्रलंबित असतानाही बेकायदेशीर कब्जा घेणाऱ्या कंपनीवर भिमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे..
याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर, जिल्हा सरचिटणीस सुनीलजी साखरे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!
