पांगरा ढोणे ग्रामपंचायत पंचायत वतीने विविध विकास कामांचे आ.डाॕ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते झाले भुमिपुज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

*पांगरा ढोणे ग्रामपंचायत पंचायत वतीने विविध विकास कामांचे आ.डाॕ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते झाले भुमिपुजन*.

 

पूर्णा /प्रतिनिधी –तालुक्यातील पांगरा ढोणे येथे जागृत हनुमान मंदिरात आयोजित कीर्तन सोहळा व विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यास आ. डॉ.रत्नाकर गुट्टे उपस्थित राहून सर्वांशी मनमोकळा संवाद साधून विविध विकासकामांची पाहाणी केली. शिवाय, आपल्या तालुक्यासह मतदारसंघातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा मांडला. सोबतच आपल्या समस्या, अडचणी आणि प्रश्न कधीही माझ्या निदर्शनास आणून द्या. ते मार्गी लावण्यासाठी आपला जनसेवक म्हणून कटिबद्ध असल्याचे आवर्जून नमूद केले.

शाहू नगर येथे नाली व सि.सि. रोड, पूर्णा रोड ते मारोती मंदिराकडे जाणारा १ कि.मी. रस्ता खडीकरण करणे आणि पूर्णा रोड ते दलित वस्तीकडे जाणारी नाली व सि.सि.रोड, या नियोजित कामांचा त्यामध्ये समावेश आहे. कार्यक्रमाचे औचित्य साधून याप्रसंगी स्थानिक जिल्हा परिषद शाळेस भेट दिली. तसेच उपस्थित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाय, तरंगल मारुती मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. तसेच प्रसिद्ध ह.भ.प. दिपक जोशी पांगरेकर यांच्या रसाळपूर्ण आणि श्रवणीय कीर्तनाचा लाभ घेतला.‌

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबरावजी ढोणे, तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई, प्रभारी बंटी कदम, पोलीस पाटील गंगाबाई ढोणे, गटविकास अधिकारी नारायण मिसाळ, गीताराम देसाई, सुधाकर खराटे, निवृत्ती काळबांडे, घनश्याम डाखोरे, बापूराव घाटोळे, मारुती बखाल बालाजी काळबांडे, महादजी देसाई, प्रमोद काळे, पांडुरंग पौळ, , उतमराव ढोणे,सुदर्शन ढोणे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.प्रारंभी प्रस्ताविक संरपच उत्तमराव ढोणे पाटील यांनी केले तर आभार सुदर्शन ढोणे पाटील यांनी मानले

Leave a Comment