*पुर्णा नगर परिषदेवर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होणार*रविवारच्या मतमोजणीकडे लागल्या नजरा*प्रतिक्षा संपली*.
पुर्णा/रमेश गायकवाड/नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व सदस्य निवडीसाठी 2डिंसेबर रोजी मतदान झाले मतदाना नंतर मतमोजणी दि.21डिंसेबर रविवार रोजी होत असून निकालाची उत्सुकता शिगेला पोचली आहे.तब्बल एकोणीस दिवस प्रतिक्षा करावी लागली दरम्यान या काळात नेत्यां पासून ते कार्यकर्त्यां पर्यत आकडेमोड करीत पैंजा लागल्या आहेत.

रविवारी याचा फैसला होत आहे.नगर परिषद निवडणूका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असायला हवा होता.पण या वेळी संपूर्ण प्रक्रियेवर इतकी घाण चढली की निवडणुकीचा पुकार झाला तोच लक्ष्मीदर्शनाचा जत्रा म्हणून याहुन लाजीरवाणे चित्र लोकशाहीचे असू शकत नाही.मुदत संपुन चार वर्षा नंतर या निवडणूका आल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व 11प्रभागातील 23सदस्य पदासाठी मतदान घेण्यात आले यात राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाने राज्यात हातात गल्लीत पायात पाय या उक्तीप्रमाणे उमेदवार उभे केले.यामध्ये भाजपने तिकिट नाकारलेल्या त्याच उमेदवाराला शिंदे शिवसेने तिकिट देऊन नगराध्यक्ष पदासाठीसौ.कमलबाई कापसे उभे केले.शिवसेना उबाठा कडुन सौ.प्रेमला संतोष एकलारे.आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या यंशवत सेनेकडून गेल्या पंधरा दिवसांपासून न.प.सदस्या असलेल्या सौ.विमलबाई लक्ष्मणराव कदम. राष्ट्रीय काँग्रेस कडून शेख हसीना बेगम.लतीफ शेख.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा. आम्रपाली केशव जोंधळे यांच्यात चुरशीची लढत रंगली या निवडणुकीत मुलभुत सोयी सुविधांकडे उमेदवारांनी पाठ फिरवली तर टक्केवारीवर प्रतिस्पर्ध्याला शांत बसविण्यात बऱ्याच जणांना यश मिळाले आहे.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी कौणाला कर दिला हे मात्र रविवारीच स्पष्ट होईल त्यामुळे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत
