उस्माननगर येथे आज आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.
डॉ. किरण दुलेवाड यांचे आवाहन
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत उस्माननगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उस्माननगर येथे आज दि.२४ सप्टेंबर रोज बुधवारी सकाळी १० वा.आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील गरजू ( नागरिकांनी) रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण दुलेवाड , डॉ.प्रदीप लोणे यांनी केले आहे.
केद्र शासन व राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सुचित केल्या नुसार माता व बालकांची आरोग्य तपासणी ” स्वस्थ नारी सशक्त परिवार ” अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगिता देशमुख व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर प्राथमिक आरोग्य केंद्र उस्माननगर येथे दि २४ सप्टेंबर रोजी बुधवारी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले आहे. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी या आरोग्य शिबिरात महीलांचा रक्तदाब , मधुमेह , दंत रोग , नेत्र रोग , स्तन व गर्भाशय , मुख व मुख कर्क रोग , तपासणी, गरोदर महिलांसाठी लसीकरण सेवा , हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी , लहान बालकांची विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून तपासणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहुन रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. तरी परिसरातील गरजू रूग्णांनी, नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ किरण दुलेवाड , डॉ प्रदीप लोणे यांनी आहे.
