*बळीराजा साखर कारखान्याने ऊस बील तीसरा हप्ता रु.९ कोटी २८ लाख रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा*.
पूर्णा /प्रतिनिधी— बळीराजा साखर कारखान्याने ऊस बिल तिसरा हप्ता दिवाळी सणाच्या मुहर्तावर करिता रुपये नऊ कोटी 28 लाख रक्कम ऊस बागायतदार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती साखर कारखान्याच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये एकुण ५७१७७२.६५९ मे.टन ऊसाचे गाळप करुन सरासरी एकुण ६३३५५०क्किटल साखर उत्पादन केले आहे. त्याप्रमाणे सरासरी साखर उतारा ११.४८ आलेला आहे. त्या अन्वये कारखान्याने शेतक-यांना पहीली उचल म्हणून रु.२५०० प्रति मे.टन व दुसरी उचल रु ३०० प्रति मे. टन तसेच तीसरी अंतिम उचल प्रति मे.टन रु १६२.३१ प्रमाणे अशी एकुण रक्कम एफ.आर.पी प्रमाणे रु २९६२.३१ प्रति मे.टन प्रमाणे गळीत हंगाम २०२४-२५ साठी शेतक-यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आलेली आहे याची सर्व शेतक-यांनी नोंद घ्यावी.
गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये सर्व ऊस पुरवठादार शेतक-यांना ऊस बील तीसरा हप्ता म्हणुन प्रति मे.टन रु १६२.३१ प्रमाणे रु.९२८.०४ लाख ऐवढी रक्कम शेतक-यांच्या बँक खाती जमा केली आहे.
तसेच गळीत हंगाम २०२५-२६ साठी १०७०० हेक्टर ऊसाची नोंद शेतकी विभागाकडे झालेली आहे. त्या अन्वये कारखान्याची यावर्षी गाळप क्षमता वाढवलेली असल्याने कार्यक्षेत्रातील सर्व ऊस बागायतदार शेतक-यांनी ऊस गाळपास जाण्याची काळजी करु नये, सभासदांचे ऊस गाळप झाल्यानंतर बिगर सभासद शेतक-यांचा ऊस गाळपास आणला जाईल व गळीत हंगाम २०२५-२६ शासन निर्णयानुसार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ पासुन प्रत्यक्ष गाळपास सुरुवात होईल याची सर्व ऊस उत्पादक बागायतार शेतक-यांनी नोंद घ्यावी. असे अहवान मा. चेअरमन शिवाजी भगवानराव जाधव व कार्यकारी संचालक अजय शिवाजीराव जाधव यांनी केले आहे.
