राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांचा पाठपुरावा यशस्वी;परभणी विभागासाठी नवीन सी-बँड रडार मंजूर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांचा पाठपुरावा यशस्वी;परभणी विभागासाठी नवीन सी-बँड रडार मंजूर

 

मुंबई, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी पत्राद्वारे ‘मिशन मौसम’ योजनेअंतर्गत परभणी विभागात नवीन सी-बँड रडार बसविण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारने मंजूर केला असल्याचे कळविले आहे.

*अत्याधुनिक डॉपलर वेदर रडार*

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण व पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यानंतर मराठवाड्यात हवामान अंदाजासाठी अत्याधुनिक डॉपलर वेदर रडार (DWR) बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

*‘मिशन मौसम’ योजनेअंतर्गत परभणी भागात आणखी एक नवीन सी-बँड रडार*

डॉ. जितेंद्रसिंह यांनी पाठविलेल्या पत्रात पुढे नमूद केले आहे की , सोलापूर येथे आधीपासून कार्यरत असलेला २५० कि.मी. परिघाचा डॉपलर रडार सध्या परभणी आणि नांदेड परिसरातील हवामान निरीक्षणासाठी वापरला जात आहे. तसेच ‘मिशन मौसम’ योजनेअंतर्गत परभणी भागात आणखी एक नवीन सी-बँड रडार बसविण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारने मंजूर केला आहे.

*शेतकऱ्यांना वेळेवर हवामानाची अचूक माहिती मिळणार*

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले की,मराठवाडा हा दुष्काळप्रवण प्रदेश असून शेतकऱ्यांना वेळेवर हवामानाची अचूक माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम अत्यंत आवश्यक होता. केंद्र सरकारकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आता हवामान अंदाजासाठी आपली क्षमता अधिक बळकट होईल.

*म्हैसमळ टेकडी, छत्रपती संभाजीनगर येथे सी-बँड प्रकारचा २५० कि.मी. परिघाचा रडार*

राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी केंद्र सरकारकडे परभणी येथे हवामान निरीक्षणासाठी डॉपलर रडार बसविण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी कळविले आहे की , म्हैसमळ टेकडी, छत्रपती संभाजीनगर येथे सी-बँड प्रकारचा २५० कि.मी. परिघाचा रडार बसविण्याचे काम सुरू आहे. या केंद्रामुळे मराठवाडा विभागातील हवामान निरीक्षण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

*राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केंद्र सरकारचे मानले अभार*

या निर्णयामुळे मराठवाड्यातील शेती, पिक संरक्षण, हवामान पूर्वसूचना व आपत्ती व्यवस्थापनाला मोठा हातभार लागणार असल्याने राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केंद्र सरकारचे अभार मानले आहे.

Leave a Comment