केंद्रीय सामाजिक राज्य न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला नांदेड–वाघाळा महानगर पालिका निवडणुकीसाठी सहा प्रभागांमध्ये जागा मिळावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश संघटक मा. विजय सोनवणे यांनी केली.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

केंद्रीय सामाजिक राज्य न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला नांदेड–वाघाळा महानगर पालिका निवडणुकीसाठी सहा प्रभागांमध्ये जागा मिळावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश संघटक मा. विजय सोनवणे यांनी केली.

दिल्ली:

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला येत्या नांदेड–वाघाळा महानगरपालिका निवडणुकीसाठी सहा प्रभागांमध्ये उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक व ‘दैनिक रिपब्लिकन गार्ड’चे मुख्य संपादक विजय सोनवणे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. डॉ. रामदासजी आठवले यांच्या दिल्ली येथील निवास स्थानी भेटून मागणी तथा निवेदन दिले. यावेळी महानगराध्येक्ष धम्मपाल धुताडे, शिवाजी भालेराव सोबत होते.

युतीनुसार भारतीय जनता पार्टी सोबत रिपाई पक्ष व सर्व कार्येकर्ते भक्कम उभा आहेत. त्यामुळे नांदेड–वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार हनुमाननगर, जयभीमनगर, शिवाजीनगर, इतवारा, खडकपुरा आणि तरोडा खुर्द या सहा प्रभागांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला निवडणूक लढविण्याची संधी देण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.

या सहकार्यामुळे पक्षाची ताकद अधिक बळकट होऊन सर्वसामान्य मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचता येईल, असा विश्वासही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment